Overview
अहमदनगर शहरातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेत्रतज्ञ व जगप्रसिध्द ‘साई सूर्य नेत्रसेवा’ ह्या संस्थेचे संचालक डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सौ. सुधा कांकरिया ह्या दांम्पत्याने लेसर किरणांच्या नेत्रशस्त्रक्रियेच्या व नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रियेमुळे जगात अहमदनगरचे नाव उंचावले. अनेक जागतिक विक्रमही केले परंतू एवढयावरच न थांबता पर्यावरणाच्या र्हासामुळे संपूर्ण मानवजात व हे जग धोक्यात आले असून ह्यावर आपल्या परीने जगाला जागे करावे व पृथ्वीवर छोटेसे जंगल उभे करावे ह्या उद्देशाने १९९५ साली उजाड, खडकाळ, डोंगराळ माळरानावर जिथे अनेक शतके कधी झाडे वनस्पती उगवली नाही अशा जागेवर औद्योगीक सांडपाण्याचा उपयोग करून उभारले एक घनदाट जंगल ‘‘साईबन’’ आणि एक आदर्श कृषी पर्यटन केंद्र स्वत: शेतकरी नसून पण विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे पाणी अडवा जिरवा, झाडे लावा, वाढवा, जगवा हा मंत्र घेऊन गांडूळखत, जीवामृत व मेडिटेशनचा उपयोग करून १२ महिने सेंद्रिय शेती विकसीत केली व त्याला मेडिटेशनचा डोस देऊन भारतातील पहिले यौगिक कृषी पर्यटन केंद्र उभारले. ‘साईबन’ मध्ये जागतीक दर्जाच्या शेतीची गती पकडून पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस, शेडनेट, ठिबक सिंचन, मल्चींग ह्या सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग वीस वर्षा पासून करत स्ट्रॉबेरी, रेड यलो कॅप्सीकम, भरताची वांगी, वेलवर्गीय भाज्या, फूलशेतीत जरबेरा, कार्नेशियन, अँथुरियम, ऑर्कीड, ह्या सारखी फुले उत्पादित करून जगाला आश्चर्यचकीतही केले.
Map
Visited 281 times, 1 Visit today